solar panel products जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेड (Jackson Engineers LTD) जी ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील जॅकसन ग्रुपचा एक भाग आहे. ही कंपनी सौर उत्पादन (Solar Production) व्यवसायाचा मोठा विस्तार करणार आहे. कंपनी सुमारे 2000 कोटी रुपये गुंतवून 2500 मेगावॅट क्षमतेच्या सौर सेल उत्पादन सुविधा उभारणार आहे. जी दोन टप्प्यांमध्ये विकसित केली जाणार आहे. त्याचबरोबर कंपनी सध्या अस्तित्वात असलेल्या सौर मॉड्यूल उत्पादन क्षमतेला 2000 मेगावॅटपर्यंत वाढवणार आहे. या माध्यमातून 1200 नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे.
solar panel products
दरम्यान कंपनीचा हा विस्तार जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेडसाठी एक महत्वाचा टप्पा आहे. जो सौर ऊर्जा उपायांसाठी वाढत्या मागणीची पूर्तता करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो. solar panel products उत्पादन क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करुन, जॅकसन आपल्या ग्राहकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. जागतिक पातळीवर नवीकरणीय ऊर्जेच्या दिशेने होणाऱ्या बदलाला मोठे योगदान देणार आहे.
कंपनी सातत्याने नवीन उंची गाठत आहे
जॅकसन ग्रुपचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन क्षमतेतील या मोठ्या वाढीची घोषणा करताना आम्ही अत्यंत आनंदित आहोत.
रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता फक्त तांदूळ नव्हे तर सरकार या ९ गोष्टी देणार फ्री
हा विस्तार बाजारात आमची स्थिती मजबूत करतो आणि जॅकसनच्या सौर उत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगतीला अधोरेखित करतो. आमची कंपनी सातत्याने नवीन उंची गाठत आहे. ही वाटचाल भविष्यातही आम्हाला पूर्णपणे एकत्रित सौर उपाय प्रदाता बनण्याचा आमचा मानस मजबूत करत असल्याचे सुनील गुप्ता म्हणाले. solar panel products
1200 नवीन नोकऱ्या निर्माण होणार
जॅकसनची दर्जेदार उत्पादने आणि सेवांबाबतची वचनबद्धता कायम राहिली आहे. नवीन अत्याधुनिक TOPCON तंत्रज्ञानासह हा विस्तार कंपनीच्या शाश्वततेला आणि नावीन्यतेला प्रोत्साहन देतो. ज्यामुळं त्यांच्या उत्पादनांचा कार्यक्षमतेमध्ये आणि विश्वासार्हतेमध्ये उच्च दर्जा सुनिश्चित केला जातो. सौर सेल उत्पादन सुविधा पहिला टप्पा पुढील 15 महिन्यांत सुरु होणार आहे. तर मॉड्यूल प्लांटचा विस्तार सहा महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मोफत झेरॉक्स मशीन, असा भरा अर्ज
या विस्तार योजनेमुळे या भागात 1200 नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. हा मोठा गुंतवणूक निर्णय भारतातील शाश्वत ऊर्जा विकासासाठी जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेडच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. भारताची सध्याची सौर सेल उत्पादन क्षमता फक्त 7 GW आहे. अशा परिस्थितीत जॅकसनचा हा विस्तार देशात होणाऱ्या आयाती वर अवलंबून न राहत देशांतर्गत उत्पादनात वाढ करेल. “आत्मनिर्भर भारत” साध्य करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
शाश्वत ऊर्जेच्या निर्मितीला मोठी चालना
जॅकसन ग्रुप सतत प्रगती करत आहे,. हा विस्तार आमच्या दृष्टिकोनाचा आणि आमच्या उच्च गुणवत्तेच्या सौर उत्पादनांसाठी वाढत्या मागणीचा पुरावा आहे. आम्ही आमची मागणीची पूर्तता करण्याच्या क्षमतेला अधिक मजबूत करत आहोत आणि ग्राहकांना उत्तम मूल्य देण्यासाठी सज्ज असल्याचे सुनील गुप्ता म्हणाले.
मनरेगा पशु शेड योजना में आवेदन कैसे करें? 2024
आगामी काळात, जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेड 5000 मेगावॅट क्षमतेचा एकत्रित सौर वेफर, सेल आणि मॉड्यूल निर्माता बनण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. जे भारताच्या नेट झिरो उत्सर्जन साध्य करण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाशी सुसंगत आहे. शाश्वत ऊर्जेसाठी बांधिलकी असलेल्या जॅकसन इंजिनिअर्स लिमिटेडने शाश्वत ऊर्जेच्या दिशेने देशाच्या प्रवासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जॅकसन ग्रुपबद्दल माहिती
1947 मध्ये स्थापन झालेली जॅकसन ग्रुप ही डिझेल जनरेटर उत्पादनात विशेष कौशल्य असणारी कंपनी आहे. आता ती एक बहुआयामी ऊर्जा उपाय प्रदाता झाली आहे. कंपनीच्या कार्यक्षेत्रात विखुरलेली ऊर्जा, सौर ऊर्जा, पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोत, पर्यायी इंधन, उच्च-तंत्रज्ञान ऊर्जा साठवण प्रणाली आणि नागरी व पायाभूत सुविधा EPC सेवा यांचा समावेश आहे.
RBI लाया UPI जैसा ULI, मिनटों में मिलेगा Bank Loan, समझिए कैसे और किसको होगा फायदा?
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.