Mukhyamantri Teerth Darshan Yojana: राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक, म्हणजेच ज्यांचं वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे, अशा व्यक्तींना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना‘ सुरू करण्यात आली आहे.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana
Mukhyamantri Teerth Darshan Yojana: मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30 हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची घोषणा केली आहे. https://d-34060356101424817660.ampproject.net/2406131415000/frame.html
आनंदाची बातमी, राज्यात अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार रिक्त पदे लवकरच भरणार…
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने‘ची घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, “देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णवी यात्रा, अमरनाथ यात्रा करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचं बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचं स्वप्न असतं, पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुरेशी माहिती नसल्यानं यात्रा करता येत नाही. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. राज्य शासन हे राज्यातील गरीब वंचित समाजाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात. या योजनेंतर्गत निश्चितच राज्यातील ज्येष्ठांचे आशीर्वाद सरकारला मिळतील आणि त्यातून निश्चितच सरकारला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.”
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’साठी अपात्र कोण ठरणार? (Who Will Be Disqualified For Mukhyamantri Teerth Darshan Yojana?)
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये Mukhyamantri Teerth Darshan Yojana
- कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, असे सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. दरम्यान, 2.50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र या योजनेसाठी पात्र ठरतील.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
पैसों की कमी से न रुके बच्ची की पढ़ाई, इसलिए सरकार स्कीम लाई
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
- प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगानं ग्रस्त नसावं, जसं की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोना, थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी.
- अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यानं पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुनं नसावं)
- जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडले गेले होते, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवलं जाणार नाही.
- जर असं आढळून आलं की, अर्जदार/प्रवाशानं खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्यं लपवून अर्ज केला आहे, ज्यामुळे तो/ती प्रवासासाठी अपात्र ठरतं, तर त्याला/तिला कधीही योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवता येईल.
- सदर योजनेच्या ‘पात्रता’ आणि ‘अपात्रता’ निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेनं कार्यवाही करण्यात येईल.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यासाठी काय पात्रता आवश्यक? (Eligibility Required For CM Tirtha Darshan Yojana?)
महिलांना पर्यटन व्यवसायासाठी 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; 7 वर्षांपर्यंत व्याज परतावा देणार
- लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक
- वय वर्ष 60 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं.
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’चा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक? (What Documents Are Required For Scheme?)
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- लाभार्थ्याचे आधार कार्ड/रेशनकार्ड
ये 7 App घर बैठे देते हैं इन्स्टंट लोन, वो भी सिर्फ 1 से 2 घंटे मे
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्रराज्यातील जन्म दाखला. (लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतंही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असणं अनिवार्य) किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक
- सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.