नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच:
• monsoon blinds नैऋत्य मोसमी पाऊस मध्यवर्ती अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणचे आणखी काही भाग आणि दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओदिशाचे काही भाग आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागात आज 8 जून 2024 रोजी पुढे सरकला आहे.
monsoon blinds
• मध्यवर्ती अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, महाराष्ट्र (मुंबईसह) आणि तेलंगणच्या आणखी काही भागात पुढील 2-3 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाला आगेकूच करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. monsoon blinds
• वातावरणातील तपांबराच्या तळाच्या आणि मध्यम पातळीवर 16° उत्तरेदरम्यान एक पट्टा तयार झाला आहे. महाराष्ट्र ते उत्तर केरळपर्यंत तपांबराच्या तळाच्या पातळीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या प्रभावाखालीः
दूध व्यवसायासाठी 0% व्याज वर जलद कर्ज योजना
• पुढील पाच दिवसात कोकण आणि गोव्यात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि केरळ, माहे, लक्षद्वीप मध्ये बऱ्याच भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह(40-50 किमी/तास) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि याणम्, रायलसीमा, तेलंगण, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि काराईकलमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.
• कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी 12 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार, 10 ते 12 जून दरम्यान केरळ आणि माहेमध्ये, 8 ते 10 जून दरम्यान दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात; मराठवाडा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल आणि तेलंगणमध्ये 8 ते 10 जून दरम्यान, मध्य महाराष्ट्रात 9 ते 11 जूनदरम्यान, कर्नाटक किनारपट्टीवर 8 ते 9 जून दरम्यान आणि उत्तरेकडील कर्नाटकच्या अंतर्गत भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. monsoon blinds
पुढील पाच दिवस उष्णतेची लाट, रात्रीचे उबदार वातावरण आणि उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा
• ईशान्य मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातील भाग या ठिकाणी तुरळक क्षेत्रात 8 ते 12 जूनदरम्यान, ओदिशा, पंजाब,हरयाणा येथे 9 ते 12 जून दरम्यान, जम्मू काश्मीर लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश येथे 10 ते 12 जून दरम्यान उष्णतेची लाट असेल .
• 8 जून रोजी उत्तर प्रदेशात तुरळक भागांमध्ये उष्णतेची लाट असेल आणि या भागातील काही ठिकाणी 9 ते 12 जून दरम्यान उष्णतेची आणि अतितीव्र उष्णतेची लाट असेल.
अखेर 40 तालुक्यात दुष्काळ अनुदान जाहीर, 23 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ते 8 जून 2024 रोजी यलो अलर्ट तर दि. 9 ते 11 जून 2024 रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे.
जिल्ह्यात दि. 7 व 8 जून 2024 या कालावधीत गडगडाट होऊन पाऊस पडण्याची व वीजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच दि. 7 जून रोजी 50 ते 60 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. monsoon blinds तसेच दि. 9 ते 11 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
या कालावधीत वीजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी
विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. monsoon blinds
शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरु
विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. monsoon blinds
नियंत्रण कक्ष व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे जिल्हा नियंत्रण कक्ष – 02362-228847 किंवा टोल फ्री 1077, 7498067835. पोलीस नियंत्रण कक्ष- 02362-228614 पोलीस टोल फ्री हेल्पलाईन-112, दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष- 02363-256518, सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष- 02363-272028, वेंगुला तालुका नियंत्रण कक्ष- 02366-262053, कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष- 02362-222525, मालवण तालुका नियंत्रण कक्ष- 02365-252045, कणकवली तालुका नियंत्रण कक्ष- 02367-232025, देवगड तालुका नियंत्रण कक्ष- 02364-262204, वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष- 02367-237239 या प्रमाणे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमाक आहे.
देशातील सर्व शेतकऱ्यांना दिले जाणार किसान क्रेडिट कार्ड
हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/district.pdf या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष ०२३६२-२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी. monsoon blinds
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.