Nagpur Bank ATM Extra Cash: एटीएममधून पैसे काढताना कमी पैसे निघाले, कार्ड अडकले किंवा फाटक्या नोटा मिळणे यासारख्या बातम्या तुम्ही यापूर्वी वाचल्या किंवा ऐकल्या असतील.
Nagpur Bank ATM Extra Cash
खरं तर असे प्रकार वरचेवर होत असतात. मात्र नागपूरमध्ये एक अगदीच उलटा प्रकार घडला आहे. येथील एका एटीएममधून दर हजार रुपयांमागे 600 रुपये अधिक मिळत होते. त्यामुळे या एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागपूरकरांनी भली मोठी रांग लावल्याचं चित्र पाहायला मिळालं.
नेमकं घडलं काय?
झालं असं की, नागपूरमधील खापरखेडा येथील अॅक्सेस बँकेच्या एटीएममध्ये हा विचित्र प्रकार घडला. येथे पैसे काढायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक ट्रानझॅक्शनमागे 600 रुपये अतिरिक मिळत होते. Nagpur Bank ATM Extra Cash
जानिए PhonePe से कैसे लें 5 लाख रुपये तक का पर्सनल लोन
म्हणजे हजार रुपये काढल्यास 1600 आणि 500 रुपये काढल्यास 1100 रुपये एटीएम मशीनमधून बाहेर पडत होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर या एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली. सदर घटना 5 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारस घडली. अनेकांनी या तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या गोंधळाचा फायदा घेतला.
कसा समोर आला हा प्रकार
Nagpur Bank ATM Extra Cash हा सारा प्रकार समोर आल्यानंतर तपासणी केली असता या एटीएम केंद्रावरील मशिनमध्ये पैशांच्या ट्रेमध्ये नोटा भरताना तांत्रिक चूक झाल्याने अशाप्रकारे अतिरिक्त पैसे बाहेर पडत होते असं सांगितलं जात आहे.
2000 कोटींची गुंतवणूक, 1200 नोकऱ्यांची निर्मिती, ‘या’ कंपनीचा पुढाकार, सौर उत्पादन वाढणार
खापरखेडा येथील स्थानिक नागरिक असलेल्या अरुण महाजन यांना हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर त्यांना तातडीने स्थानिक पोलिसांना कळवलं. Nagpur Bank ATM Extra Cash तसेच अरुण महाजन यांनी संबंधित बँकेलाही घडत असलेला प्रकार कळविल्यावर एटीएम दुपारी बंद करण्यात आलं. त्यानंतर झालेली तांत्रिक चूक दुरुस्त करण्यात आली.
बँकेला बसला लाखोंचा फटका
मात्र हा गोंधळ लक्षात येऊन बँकेने चूक दुरुस्त करेपर्यंत या एटीएममधून सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक रुपये अतिरिक्त पैसे म्हणून निघून गेल्याचं समोर आलं आहे.
लाडकी बहीण योजना अर्ज बंद झाले
दुपारी एटीएम बंद करत दुरुस्तीनंतर संध्याकाळी 7 वाजता एटीएम सुरू करण्यात आलं. एका नागरिकाने हा सगळा प्रकार वेळीच लक्षात आणून दिला नसता तर यामध्ये आणखी फटका हा बँकेला बसला असता.
अशा वेळी कशी केली जाते पैशांची वसुली…
सामान्यपणे अशाप्रकारे अतिरिक्त पैसे गेले असतील तर संबंधित एटीएममधून त्या वेळेत कोणत्या कार्डवरुन पैसे काढण्यात आले आणि किती पैसे काढले गेले याची नोंद बँकेकडे असते.
Personal Loan लेने के लिए कितना चाहिए न्यूनतम क्रेडिट स्कोर, झटसे मिलेगा लोन
अशा तांत्रिक चुकीच्या काळात काढलेल्या पैशांमधून हे अतिरिक्त पैसे खात्यावरुन कमी केले जातात. विड्रॉअल अॅडसेटमेंट असं या तडजोडीला म्हटलं जातं. अशी तडजोड केल्यास संबंधित खातेदाराला मेसेजच्या माध्यमातून त्यासंदर्भातील माहिती दिली जाते. काही वेळेस असा प्रसंगी सीसीटीव्ही फुटेजही तपासले जातात.
Discover more from Loansolution
Subscribe to get the latest posts sent to your email.