Ration Card per loan 2024: रेशन कार्ड तयार करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card per loan गोरगरीब, श्रमिक, गरजूंना माफक दरात अन्नधान्य देण्यासाठी साधारण रेशन कार्ड दिले जाते. आपल्याकडे रेशन कार्डचे अनेक प्रकार आहेत. राज्य सरकारतर्फे नागरिकांचे वेगवेगळ्या गटांत वर्गीकरण करून त्या-त्या गटानुसार त्यांना वेगवेगळे रेशन कार्ड दिले जाते.

रेशन कार्ड हे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातून काढता येते किंवा आता ऑनलाइन पद्धतीनेही रेशन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Ration Card per loan

मुख्यमंत्री वयोश्री योजना असा भरा अर्ज 3000 रू मिळणार

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न आणि सुरक्षा कायदा नागरिकांना परवडणाऱ्या किमती चांगल्या गुणवत्तेचे अन्न पुरवण्यासाठी पारित केला होता. एनएफएसए हा कायदा देशातील सर्व राज्यांसाठी दोन प्रकारचे रेशन कार्ड प्रदान करतो. प्रत्येक रेशन कार्ड आणि आधार क्रमांक लिंक करण्यात आलेला आहे. Ration Card per loan

रेशन कार्डचे दोन प्रमुख प्रकार

केशरी रेशन कार्ड

हे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार ते एक लाखापर्यंत आहे, त्यांनाच दिले जाते. ज्यांचे स्थिर उत्पन्न नाही किंवा अत्यल्प उत्पन्न आहे, त्यांना हे कार्ड दिले जाते. बेरोजगार लोक, महिला आणि वृद्ध या वर्गात मोडतात. हे कार्डधारक प्रत्येक कुटुंब दरमहा ३५ किलो अन्नधान्य घेण्यास पात्र आहे. त्यांना तांदळासाठी प्रतिकिलो तीन रुपये, गव्हासाठी दोन रुपये अनुदानित दराने अन्नधान्य मिळते.

पांढरे रेशन कार्ड

याशिवाय ज्यांचे उत्पन्न अधिक आहे किंवा ते शासकीय कर्मचारी म्हणजे त्यांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते.

Loansolution

घर बैठे आधार कार्ड से पाएं 50,000 रुपये का लोन, जानें कैसे

रेशन कार्डचे फायदे

रेशन दुकानातून अनुदानित दरात अन्न पुरवठा मिळवणे. याशिवाय रेशन कार्ड हे सरकारतर्फे दिले जात असल्याने रेशन कार्डचा पुरावा हा संपूर्ण देशात अधिकृत ओळखीचा पुरवा म्हणून ग्राह्य धरला जातो. Ration Card per loan पॅन कार्डसाठी अर्ज करताना, वाहन परवाना, आधार कार्ड किंवा बँक खाते उघडण्यासाठी आणि बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अथवा अन्य कुठेही ओळखीचा पुरावा म्हणून रेशन कार्डला महत्त्व आहे. याशिवाय महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णालयातील उपचार घेण्यासाठी राज्यातील सर्व रेशन कार्डधारक पात्र आहेत.

कार्ड तयार करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक

रेशन कार्ड काढण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला (सातबारा उतारा, वीजबिल), आधार कार्ड (कुटुंबातील सर्वांचे), १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन भरणे आवश्यक आहे.

Loansolution

“फ्री सोलर चूल्हा योजना” आवेदन करें

याशिवाय शिधापत्रिका काढण्यासाठी, तुम्हाला जवळच्या ऑनलाइन सुविधा केंद्रात, आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन किंवा घरबसल्या www.rcms.mahafood.gov.in या वेबसाइटद्वारे अर्ज करता येतो. अर्ज करताना त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जोडावीत. त्यानंतर संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे जाऊन एकदा फोटो व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागते. Ration Card per loan

पुरवठा विभागाकडून दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना पिवळे रेशन कार्ड, ज्यांचे उत्पन्न १ लाखापर्यंत आहे त्यांना केशरी रंगाचे, तर १ लाखाहून अधिक उत्पन्न ज्यांचे आहे त्यांना पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड दिले जाते.

अंत्योदय योजनेतील लाभार्थींना प्रति कार्डावर महिन्याला २० किलो तांदूळ व १५ किलो गहू असे ३५ किलो मोफत धान्य मिळते. प्राधान्य कुटुंब कार्डावर प्रति कार्ड ३ किलो तांदूळ व २ किलो गहू मोफत मिळतात. तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयाला पूर्वी मोफत धान्य दिले जायचे मात्र आता त्या कुटुंबात प्रति माणसी १५० रुपये रोख डीबीटीमार्फत थेट अनुदान खात्यात जमा केले जाते.

Loansolution

इस सरकारी योजना पर बिना गारंटी मिल रहा लोन, आज ही यहां करें आवेदन, शुरू करें अपना कारोबार

रेशन कार्डामध्ये साधारणतः विवाहित महिलेचे, किंवा लहान मुलांची नावे नव्याने समाविष्ट करावी लागतात. लग्न होऊन नवऱ्याच्या घरी आलेल्या महिलेचे तिच्या माहेरच्या रेशन कार्डातून नाव वगळल्याचे प्रमाणपत्र सादर केले की नव्याने नाव समाविष्ट करता येते. तर, घरातील लहान सदस्यांचे नाव रेशन कार्डामध्ये समाविष्ट करण्यासाठी जन्माचे प्रमाणपत्र किंवा त्याचे आधार कार्ड जोडून अर्ज करावा लागतो, असे शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी डी.सी. मेंडके यांनी सांगितले. Ration Card per loan


Discover more from Loansolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Reply