RBI Action संबंधित काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल RBI ने हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (HSBC) वर 29.6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि रुपी डिनोमिनेटेड को-ब्रँडेड प्रीपेड कार्डच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल HSBC बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे, असे केंद्रीय बँकेने एका निवेदनात म्हटले आहे.
RBI Action
RBI च्या मते, 31 मार्च 2022 रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात तपासणी करण्यात आली. त्यात आरबीआयच्या निर्देशांचे पालन केले नसल्याचे आढळून आले. त्या संदर्भात बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. त्यामध्ये बँकेला कारणे देण्यास सांगण्यात आले होते, या सूचनांचे पालन न केल्याने बँकेला दंड का आकारण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली होती.
👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈
आरबीआयने म्हटले आहे की नोटीसला बँकेचा प्रतिसाद, वैयक्तिक हजेरी दरम्यान दिलेले तोंडी उत्तर आणि बँकेने दिलेली अतिरिक्त माहिती लक्षात घेतल्यानंतर असे आढळून आले की, इतर गोष्टींबरोबरच, बँकेवरील आरोप सिद्ध झाले आहेत. ज्यासाठी आर्थिक दंड आकारणे आवश्यक होते.
हे ही पाहा : महिलांना तीन सिलिंडर मोफत, शेतकऱ्यांना मोफत वीज, तरुणांना भत्ता? यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस?
RBI Action आरबीआयने म्हटले आहे की, बँकेने आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा उद्देश नाही. आर्थिक दंड लादल्याने RBI ने बँकेविरुद्ध सुरू केलेल्या इतर कारवाईचा बँकेच्या कोणत्याही व्यवहारावर विपरीत परिणाम होणार नाही.
मोठी बातमी! HDFC बँकेचे ‘हे’ नवे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार, वाचा तुमच्या खिशावर काय परिणाम पडणार?